VK VAYAM

Vivekananda Kendra • Serving Bharat

योग विमर्श - आभा मंडळाचे विज्ञान एक आधुनिक शास्त्र ( Session 23 )

योग विमर्श · पुष्प २३

विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट

(वि.के.वयम्) · विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचा प्रकल्प

▸ योग विमर्श — विशेष व्याख्यान

'आभा मंडळाचे विज्ञान —
एक आधुनिक वैद्यकीय शास्त्र'

📅 १४ फेब्रुवारी, २०२६ 📍 प्रणव नगरी, सोलापूर 🔢 पुष्प २३ वे
🩺
मुख्य वक्ते
डॉ. अनुप देव
दंत चिकित्सक & संस्थापक,
इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन्स अँड रिसर्च सेंटर

विवेकानंद केंद्र वेदांतिक एप्लीकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट (VK VAYAM), प्रणव नगरी सोलापूर येथे दि.१४ फेब्रुवारी, २०२६ रोजी योग विमर्श चे २३ वे पुष्प गुंफले गेले. या अंतर्गत 'आभा मंडळाचे विज्ञान एक आधुनिक वैद्यकीय शास्त्र' या विषयावर डॉक्टर अनुप देव यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

डॉक्टर अनुप देव यांनी आपल्या व्याख्यानातून आभा मंडळ म्हणजेच बायो फिल्ड बद्दल माहिती दिली. हे विज्ञान चरक संहितेमध्ये १७ व्या अध्यायामध्ये मांडलेले आहे. हे खूप पुरातन सुपर विज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. या शास्त्रावर २१ व्या शतकामध्ये प्रगत देशांमध्ये संशोधन सुरू झाले आहे.

🌐 आपल्या प्रत्येकाच्याच भोवती फुटबॉल एवढे मोठे आभामंडळ (Aura) असते.

पंचकोश आणि शरीराची रचना

🌾
अन्नमय कोश
स्थूल शरीर
🌬️
प्राणमय कोश
सूक्ष्म शरीर
🧠
मनोमय कोश
सूक्ष्म शरीर
💡
विज्ञानमय कोश
सूक्ष्म शरीर
आनंदमय कोश
कारक शरीर

स्थूल शरीराचे नियंत्रण सूक्ष्म शरीर — बहात्तर हजार नाड्या, सात चक्रे आणि पंचकोश यामार्फत चालते.

व्याधीचे मूळ — सूक्ष्म शरीर

कुठलीही व्याधी स्थूल शरीरामध्ये प्रकट होण्याआधी सूक्ष्म शरीरामध्ये होते. या व्याधीचे कारण — गत जन्मातील संस्कार, या जन्मातील जीवनशैली आणि इतर गोष्टींचा समावेश असतो. या सर्व गोष्टी त्यांनी उदाहरणासहित स्पष्ट केल्या.

डॉक्टर अनुप देव यांनी पंचकोशाची माहिती दिली. प्रत्येक कोषाचे कार्य विशद केले. तसेच सात चक्रे यांचे स्थान, त्यांच्यासाठी असणारे अक्षर, त्याचा चिकित्सा मध्ये उपयोग इत्यादी गोष्टींची माहिती दिली.

त्यांच्या संशोधन केंद्रामध्ये या आभामंडळाचा अभ्यास केला जातो. आभा मंडळाचे स्कॅनिंग — म्हणजेच फोटो काढून — त्याद्वारा आपल्या शरीरातील भूत, वर्तमान आणि भविष्य काळातील आरोग्याच्या समस्यांचे विवरण केले जाते. या स्कॅनिंगमध्ये आपल्या विचारांमुळे व शरीरातील घडामोडींमुळे होणाऱ्या बायोफोटॉनचे उत्सर्जन बघता येते.

आधुनिक वैदिक तपासण्या शरीरात व्याधी निर्माण झाल्यावर त्याचे निदान करतात. परंतु संपूर्ण शरीर चिकित्सा या तंत्राद्वारे शरीराला स्पर्श न करता भविष्यात उद्भवणाऱ्या व्याधी बद्दल अचूक निदान करता येते.

भारतीय मंदिरांमधील शास्त्र तसेच त्या मंदिरांमधील फ्रिक्वेन्सी आपल्याला कशी उपयुक्त आहे हे सांगितले. या मंदिरांमधील फ्रिक्वेन्सीचा आपल्या आभामंडळावर होणारा परिणाम चित्रांद्वारे दाखवले.

'तुझे आहे तुझ्या पाशी' — ही सात चक्रे, नाड्या आणि पंचकोश आपल्याजवळ आहे.
त्याचा विस्तार करणे, त्याला सुदृढ आणि व्यवस्थित ठेवणे हे आपल्याच हातात आहे.

— डॉ. अनुप देव यांचा संदेश

एकूणच आपल्या ऋषीमुनींनी विकसित केलेले आभा मंडळाचे विज्ञान हे एक खूप प्रगत शास्त्र आहे. ह्या विज्ञानाला ऋषीमुनींनी अध्यात्माची सुंदर जोड देऊन अतिशय सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवले आहे. याची माहिती सर्वांना मिळाली. म्हणजेच हा सूर्य, हा जयद्रथ असे डॉक्टर अनुप देवांनी आपल्याला दाखवले.

कार्यक्रमाचे क्षण

कार्यक्रमाचे आयोजन
प्रास्ताविक श्री. वामन दादा कुलकर्णी
वक्त्यांचा परिचय सुश्री वैशाली ताईं वाघीरकर
प्रार्थना कु. गार्गी घुन्गुर्डे
समारोप श्री. सुहास देशपांडे (प्रकल्प प्रमुख)
सूत्रसंचालन सौ. नंदिनी ताईं स्वामी
Join the Movement

Human Excellence Through:
Yoga — The Way of Life

Whether you are a student, teacher, professional or institution — VK VAYAM Solapur welcomes you to discover the transformative power of Yoga and India’s timeless management wisdom.

Read Our Posts → Get In Touch
📍 Plot No.12-22, Pranav Nagari, Jule Solapur
📞 0217 - 2991205  |  9423526118
Powered by Blogger.