VK VAYAM

Vivekananda Kendra • Serving Bharat

योग विमर्श - जीवनदर्शक उपनिषदे – काल, आज आणि उद्या ( Session 24 )

 विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट
(वि.के.वयम्)

योग विमर्श - जीवनदर्शक उपनिषदे – काल, आज आणि उद्या


विवेकानंद केंद्र वयम् च्या वतीने दि.२२ मार्च २०२६ रोजी श्रीमती माधवी जोशी पुणे.यांचे "जीवनदर्शक उपनिषद" काल,आज आणि उद्या या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले.  त्यांनी उपनिषदाचे महत्त्व अतिशय सोप्या भाषेत सांगितले. दहा हजार वर्षांपूर्वीचे हे ज्ञान काल,आजही आणि उद्याही कालबाह्य होणार नाही असेच आहे. हे विश्व म्हणजे चमत्कृतीचे मोठे भांडार आहे.


ऋषीमुनींनी त्याकाळी आपल्या तपाने निरीक्षणाने विविध शोध लावले. ज्ञानचक्षूने विचार, विवेक यातून सूक्ष्म तरल चिंतनातूनच वेद निर्माण झाले. वेदाचेच व्यासांनी चार भाग स्वतंत्र केले. त्यातला चौथा भाग म्हणजे,"उपनिषद". एकांत व त्यातून आत्मसंवाद आणि त्यातून काही रहस्ये उलघडत गेली. शुद्ध ज्ञान, आत्मशोध यातून ज्ञानाची गुरुकिल्लीच जणू त्यांना सापडली.


"गीता" हे उपनिषदाचेच सार आहे. उप म्हणजे जवळ. नि म्हणजे निश्चयात्मक. षद म्हणजे शिथिलता, शाश्वताचे चिंतन, आंतरिक अज्ञान गाठी उकलण्याचेच मार्गदर्शन. तिळातले तेल, फुलातला सुगंध, दुधातले लोणी, उसातला गूळ, लाकडातला अग्नी. हे जसे प्रथमदर्शनी दिसत नसले तरी त्यात हे आहेच असे मानावेच लागते.  देहातला आत्मा दिसत नसला तरी तो मानावाच लागतो, मी म्हणजे नेमका कोण? याचा शोध घेणे म्हणजे त्या तत्त्वापर्यंत वाट शोधत जाणे.


त्यासाठी एक मार्गदर्शक रस्ता म्हणजेच उपनिषद.... यांच्या अभ्यासाने आपल्याला आत्मतत्त्वाची ओळख व्हायला मदत होते. काही छोटी तत्वे आचरणात आणू लागलो तर हे काम अधिक सुलभ होऊ शकते.," मी" "माझे "कर्तृत्व "यात अडकलो की कधीच आपल्याला आत्मतत्त्व जाणवत नाही. उपभोग घ्यावा पण तो त्याग पूर्वक असावा. घेण्यापेक्षा देणे जास्त महत्त्वाचे समजावे. स्व चा परिघ संकुचित न ठेवता विस्तार करण्याची वृत्ती असावी, निसर्गाच्या नियमांना कधी नावे ठेवू नयेत. 


उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या गरजेच्या गोष्टी सृष्टीच्या त्या सहजतेनेच स्वीकारता आल्या पाहिजेत. त्यांची व अन्नाची निंदा करू नये. जिभेने निंदा न करता ती परमेश्वरी नामासाठी वापरावी. शरीराच्या रथाचा "आत्मा" हा चालक आहे. मनाचा लगाम मात्र बुद्धीच्या हातात द्यावा. आपण स्वतःला जीव समजून अज्ञानात जगतो, पण आपणास ब्रह्मज्ञान झाल्यानंतरच आपण ब्रह्म आहोत हे सत्य उमगते, त्यासाठी मनाची विशालता व सर्व प्राणिमात्रातील आत्म्याकडे एकत्वाने पाहणे, ही सुधारणा कशी करावी याबद्दलचे मार्गदर्शन उपनिषद करीत राहते. विज्ञानाने उद्याचा काळ कितीही प्रगतिशील वाटला तरी पंचमहाभूताचे महत्त्व व गरज हे कधीच कमी होणारे नाही. तसेच त्यामुळे भारतीयांचे असलेले हे तत्त्वज्ञान त्रिकाला बाधित असेच सत्य आहे, हे मानावेच लागेल.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.शुभांगी ताई कुलकर्णी  यांनी केले. वक्त्यांचा  परिचय सुश्री वैशाली ताईं वाघीरकर यांनी करून दिला. प्रार्थना मीरा ताईनी घेतली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मृणालिनी ताई पंडित यांनी केले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे श्रीमती माधवी ताई जोशी यांनी दिली. कार्यक्रमास ८५ जण उपस्थित होते.









Join the Movement

Human Excellence Through:
Yoga — The Way of Life

Whether you are a student, teacher, professional or institution — VK VAYAM Solapur welcomes you to discover the transformative power of Yoga and India’s timeless management wisdom.

Read Our Posts → Get In Touch
📍 Plot No.12-22, Pranav Nagari, Jule Solapur
📞 0217 - 2991205  |  9423526118
Powered by Blogger.